पिंपरीगावात विर्सजनासाठी कृत्रिम तलावास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
334

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – गणेशोत्सवानिमित्त घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करता यावे यासाठी पिंपरीगावात माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाला गणेशभक्तांचा प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी सुमारे 215 नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनाचा लाभ घेतला.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, कोरोना काळात महापालिकेच्या वतीने विसर्जन घाट बंद करून संकलन केंद्र उभारण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना धार्मिक पद्धतीने विधिवत गणेशमूर्तींचे विसर्जन तसेच संकलन करता यावे, याकरिता मागील दोन वर्षापूर्वी कृत्रिम तलाव व फिरते विसर्जन हौदांची व्यवस्था प्रभागातील तसेच परिसरातील नागरिकांसाठी करण्यात आली होती. तीच परंपरा पुढे चालू ठेवत याही वर्षी जनसंपर्क कार्यालयाच्या पटांगणामध्ये करण्यात आलेली असून गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी सुमारे 215 नागरिकांनी भक्तिमय वातावरणात गणेशमूर्ती विसर्जनाचा लाभ घेतला.

गणेश मूर्ती संकलन व विसर्जन हौद याची व्यवस्था शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार असणार आहे याकरिता अमित कुदळे 9673494149,शुभम शिंदे -7758040909,किरण शिंदे – 8459559820, अभिजित चव्हाण – 8484848979 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाप्रमाणेच यापुढे होणार्‍या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांमध्येच जास्तीत जास्त मूर्ती विसर्जन करून प्रदुषण रोखण्याच्या कामात सहभागी होऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.