पावसाचा धुमाकूळ… एसीपी कार्यालयाचं छत कोसळून सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

0
29

दि . २६ ( पीसीबी ) – दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस बरसला. गाझियाबादमध्ये एक दु:खद घटना घडली. अंकुर विहार एसीपी कार्यालयाचं छत कोसळून उपनिरीक्षक वीरेंद्र कुमार मिश्रा यांचा जागेवर मृत्यू झाला.

शनिवारी रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. हवामानखात्याने दिल्ली आणि लगतच्या भागात पश्चिम आणि वायव्येकडून वादळ येण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांतच दिल्लीत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग ताशी ७० किमी होता तर काही ठिकाणी त्याहून अधिक होता. राष्ट्रीय राजधानी नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडासह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.