पावसाचा जोर कायम; शहरातील शाळांना आता शनिवारपर्यंत सुट्टी

0
277

पिंपरी दि.१४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने बुधवारी आणि गुरुवारी शाळांना दिलेल्या सुट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे.   शहरातील सर्व शाळांना आता शनिवार (दि.16) पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले आहेत. 

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पाऊस वाढला आहे. सगळीकडे पाणीच-पाणी झाले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आज पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.  आणखी काही दिवस जोराचा पाऊस राहणार आहे. रेड अलर्टही दिला आहे.  येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्हाधिका-यांनी इंदापूर, बारामती, दौंड, शिरुर, पुरंदर तालुके वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळांना 16 जुलैपर्यंत सुट्टी दिली आहे.

त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळा (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) अशा सर्व शाळांनाही 16 जुलैपर्यंत  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.