पालिकेच्या ड प्रभागाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मशाल मार्च रँलीचे आयोजन.

0
174


पिंपळे गुरव, दि. १० (पीसीबी) -पिंपळे गुरव येथे तुजाभवानी मंदिर ते राजमाता जिजाऊ उद्यान पर्यंत मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्त्री म्हणजे राख नही, धगधगता अंगार है..स्त्रीचा आभिमान आणि स्वाभिमान कृतृत्त्वाची जाणीव व्हावी म्हणून मशाल मार्च आयोजन केले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले कि महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासने व धाडसाने कार्यरत आहेत तसं पाहिलं तर खुरपणीपासून ते नासापर्यंत आणि राष्ट्रपती पदापर्यंत महिला कार्यरत आहेत.कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहीलेल्या नाहीत.
रामेश्वर महाजन बेसिक टिमचे सिटी इनचार्ज.म्हणाले कि,जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी,त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी.हे नारी तु घे भरारी ,बघेन कौतुकाने दुनिया सारी. असे म्हटले आहे यावेळी राजमाता जिजाऊ उद्यान च्या समोरच पटनाटयातुन जनजागृती केली तर कु.अर्वी कांबळे या मुलीने मर्दानी खेळ खेळून उपस्थितीतांचे मन जिंकली.
यावेळी सडक सुरक्षा सप्ताह निमित्त सर्वांना आण्णा जोगदंड यांनी सुरक्षितेची शपथ तर पर्यावरणाची जयश्री आरणे यांनी शपथ देऊन मशाल रँलीची सांगता करण्यात आली.
यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक, वाय. बी. फल्ले ,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती च्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरूण पवार, माजी नगरसेवक महेश जगताप, राजू लोखंडे, सागर अघोळकर चंदाताई लोखंडे, उषाताई मुढे, सा.मा.सुरेश सकट ,राजू ओव्हाळ ,मुकादम,सिद्धार्थ जगताप अशोक सोनटक्के बेसिक सिटी इनचार्ज,रामेश्वर महाजन ,वॉर्ड इनचार्ज स्वराज कांबळे ,निकेश सरवदे ,समाधान कांबळे मारुती कांबळे,दीपक चौर राहुल जाधव, राहुल चव्हाण,ऋतुजा पेडणेकर ,डॉ भूषण पेडणेकर, पल्लवी भाटे,अनेक महिला व नागरिक सहभागी झाले होते.