भोसरी, दि. २९ –
आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर वैष्णवांच्या भक्तीचे आणि सनातन हिंदुत्वाचे 200 फुटी भव्य भगवे निशाण फडकले जावे, अशी संकल्पना आमदार महेश लांडगे यांनी मांडली होती, त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होते आहे.
आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावरील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फुटी उंच भगवा ध्वज उभारणीचा भूमिपूजन सोहळा उद्या रविवार दि. 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा हिंदू नववर्ष दिनाच्या अमृतमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आमदार लांडगे यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.