ताथवडे, दि. ८ (पीसीबी) – महिलेच्या नावाने पार्सल आले असून त्यामध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत तिची फसवणूक करण्यात आली. ही घटना 29 नोव्हेंबर 2023 रोजी ताथवडे येथे घडली.
या प्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8212331922 या क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस फोन केला. फोन करून फोनवरील व्यक्तीने, मी फेडेक्स कुरिअर कंपनीमधून बोलत आहे. आमच्या फेडेक्स कंपनीमध्ये तुमच्या नावाने पार्सल आले आहे. त्या पार्सल मध्ये 750 ग्रॅम ड्रग्ज, पाच क्रेडिट कार्ड व पाच पासपोर्ट असे सापडले असून नार्कोटिक्स डिपार्टमेंट अंधेरी मुंबई यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर स्काईप ॲपद्वारे व्हिडिओ कॉल करून फिर्यादी यांना विश्वासात घेत त्यांच्या मोबाईलवरून 1401 हा क्रमांक डायल करायला सांगण्यात आला. फिर्यादी महिलेने तो क्रमांक डायल केला असता त्यांच्या खात्यातून चार लाख 19 हजार रुपये इतर बँक खात्यावर ट्रान्सफर झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.