पार्सल अडकल्याचे सांगून महिलेच्या नावे काढले 19 लाख रुपयांचे पर्सनल लोन

0
231

वाकड, दि. २९ (पीसीबी) – नागरिक हो सावधान… माझ्या खात्यावर कुठे मोठी रक्कम असते मग माझी ऑनलाईन फसवणूक कोण करेल असा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या खात्यावर रक्कम नसली तरी तुमचे बँक खाते व इतर कागदपत्राद्वारे तुमच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फसणूक केली जात आहे.

त्याचेच एक उदाहरण वाकड मध्ये घडले आहे. एका महिलेला तिचे पार्सल अडकले असून त्यासाठी काही फॉर्मीलीटीज नार्कोटीक्स डिपार्टमेंट सोबत पुर्ण कारव्या लागतील म्हणून दिशाभूल केली. तसेच फिर्यादीला बोलण्यात गुंतवून त्यांचे बँक खाते, आधारकार्ड यांची माहिती घेत तब्बल 19 लाख 4 हजार 101 रुपयांचे पर्सनल लोन काढून महिलेची फसवणूक केली आहे.ही घटना 19 जानेवारी रोजी वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधीत महिलेने रविवारी (दि.28) फिर्याद दिली असून यावरून +918214091225 हा मोबाईल धारक आकाश कुमार, अमनी कोंडाल व बेनिफिशरी बँक खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आकाश नावाच्या व्यक्तीन फोन करुन फिर्यादी यांनी तैवानमध्येकाही पार्सल पाठवले आहेत , ते पार्सल मुंबई येथील नार्कोटीक्स डिपार्टमेंट मध्ये अडकले आहे अशी माहिती दिली. तो फेन नार्कोटीक्स डिपार्टमेंटला जोडत असल्याचे सांगून फिर्यादीचे बँक खाते चेक करायचे आहे असे सांगितले. यावेळी फिर्यादीला स्काईपवरून व्हिडिओ कॉल करून त्यांची कागदपत्रे व बँक खात्याची माहिती घेतली. यावेली त्यांनी फिर्यादीच्या नावे 19 लाख 4 हजार 101 रुपयाचे पर्सनल लोन काढले. हे लोन फिर्यादीच्या खात्य़ावर येताच त्यांनी बेनिफिशरी बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.