पार्थ पवार यांच्या भेटीला गुंड गज्या मारणे, राजकिय वर्तुळात मोठी खळबळ

0
441

पुणे, दि. २५ (पीसीबी) : कोथरुडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली. मारणेने पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारणेने पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मारणेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणे टोळीची कोथरुड, तसेच शहरात दहशत आहे. मारणेचे पत्नी जयश्री या मनसेच्या नगरसेविका होत्या. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मारणे आणि त्याची पत्नी जयश्री उपस्थित होते.

दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारणे याच्या भेटीमुळे कोथरुडमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, पार्थ पवार यांना लोकसभाा निवडणुकिसाठी मावळ किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीची उमेदवारी देण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. पुणे शहर आणि परिसरात गुंड मारणे याची मोठी दहशत असल्याने या भेटामागे नेमके काय कारण असावे यावर तर्कवितर्क सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नेमके काय चालले याबाबत संभ्रम आहे.