पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने सतरा लाखांची फसवणूक

0
288

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – पार्ट टाइम जॉब देण्याच्या पाहण्याने बिजनेस ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यास सांगत 17 लाख 18 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला आणि अन्य अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना पार्ट टाइम जॉब करण्यासाठी विचारले. त्यासाठी अठरा बिजनेस ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यास सांगून फ्री डिपॉझिटवर व्याजासह मूळ रक्कम देण्याचे आमिष दाखवले. वारंवार बिजनेस ऍक्टिव्हिटीच्या लिंक पाठवण्याचा बहाना करून फसवणुकीच्या इराद्याने पैसे देण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ऑनलाईन जॉब कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून फिर्यादी कडून आरोपींनी 17 लाख 18 हजार 656 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.