पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने सव्वा पाच लाखांची फसवणूक

0
69

चाकण, दि. १६ (पीसीबी)

पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने विश्वास संपादन करून वेगवेगळे टास्क देत एका व्यक्तीची पाच लाख 21 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 ते 24 मे या कालावधीत चाकण येथे घडली.

राहुल महादेव गानगीर (वय 31, रा. चाकण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला मेसेज केला. त्यानंतर त्यांना पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तिथे त्यांना एका ग्रुपमध्ये जॉईन केले. ग्रुपमध्ये वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यांना वेगवेगळे टास्क दिले. सुरुवातीला 100 रुपये, 210 रुपये परतावा दिला. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादीकडून पाच लाख 21 हजार 600 रुपये घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.