पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक

0
84
187143521

निगडी, दि. 12 जुलै (पीसीबी) – पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने महिलेला टास्क देऊन तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेत 8 लाख 9 हजार 656 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 जून ते 14 जून या कालावधीत संभाजी चौक, आकुर्डी येथे घडला.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8085666859, 7619033766, 9039958561, 9954949698 क्रमांक धारक, https://t.me/Amazon668990, https:/btc.tradingvidya.com/wap लिंक वापरकर्ता, मोहित कुमार गुप्ता, सागर श्रीनिवासा राव वांगा, करण पानवार, जे डी एंटरप्राईजेस, सचिन कृष्णा सारंगे, महामाया इलेक्ट्रिकल्स, परहित सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, ममत्वा फाउंडेशन खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीची व्हॉट्स ॲपवरून संपर्क केला. त्यांना एका ग्रुपला जॉईन करून पार्ट टाइम काम देण्याचे आमिष दाखवले. त्यातून त्यांना भरपूर पैसे मिळतील असेही सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी महिलेला वेळोवेळी टास्क देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी आणखी पैशांची मागणी करत त्यांच्याकडून एकूण आठ लाख 9 हजार 656 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.