पार्ट टाइम जॉबच्‍या नावाखाली फसवणूक

0
93

दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) चिंचवड,
पार्ट टाइम जॉबच्‍या नावाखाली एका तरुणीची चार लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना वाल्‍हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ६) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मालकॉल्‍म मोबाइल नंबर ९६६१७४९४१२, साराखा तुमसारा मोबाइल नंबर ९६५०१५३५४६, व्हॉट्‌सअॅप ग्रुप अॅडमिन स्वामी देवराज मोबाइल नंबर ८९७१८१५२०७ यांच्‍यासह एकूण २३ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना २२ जून ते २७ जून २०२४ या कालावधीत वाल्‍हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना पार्टटाईम जॉब देण्याचे आमिष दाखविले. त्‍यासाठी पैसे भरण्यास सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्‍या मोबाईल नंबर यावर व्हॉट्सअॅप व टेलिग्राम टास्कद्वारे मेसेजेस पाठवुन फिर्यादी यांची एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.