पार्ट टाइम जॉबच्या आमिषाने 22 लाखांची फसवणूक

0
2

रावेत, दि. 22 (पीसीबी) –

पार्ट टाइम जॉबचे आमिषे दाखवून महिलेची तब्बल 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी (दि.21) रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 19 ते ते 23 ऑगस्ट दरम्यान रावेत येथे घडला.

या प्रकरणी रावेत येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार संबंधीत खातेधारक व टेलिग्राम अकाउंट धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला टेलीग्राम वेबसाईट वरून एका महीलेने पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज केला. टेलीग्राम वेबसाईटवर एका ग्रुप मध्ये जॉईन केले. सुरवातीला त्यांनी एका लिंकवर फिर्यादी यांचे अकाउंट बनवून फिर्यादी यांना तेथे काही प्रीपेड टास्क करण्यास सांगीतले. त्यानंतर वेगवेगळया खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. ती रक्कम रक्कम ऑनलाईन टास्क मध्ये वापरली जाईल व नंतर ती रक्कम कमिशन सहित परत केली जाईल असे सांगितले. फिर्यादी यांना गोल्ड माईनींगचा एक टास्क करायला सांगितला. तो टास्क केल्यानंतर त्यांनी पैसे बँक खात्यात जमा केले नाहीत. त्यानंतर त्यांनी वेगवगेळ्या बँक खात्यात पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी एकूण 21 लाख 95 हजार 102 रूपये भरले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.