पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

0
286

मारुंजी, दि. ३० (पीसीबी) – पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने एका व्यक्तीची 13 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी फिर्यादी यांना मेसेज करून ‘आम्ही नवीन कंपनी सुरु करीत आहोत. आम्हाला पार्टटाईमसाठी मुले व मुली पाहिजे. तुम्हाला दिवसाला 1500 ते 2500 रुपये मिळतील’ असे आमिष दाखवण्यात आले. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपींनी फिर्यादीकडून 13 लाख पाच हजार 452 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना ती रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.