पार्किंग मधून दुचाकी पळवली

0
334

चिखली, दि. १९ (पीसीबी) – सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी कृष्णा हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर चिखली येथे उघडकीस आली.

अक्षय कैलास दहिवाल (वय 21, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/जीडब्ल्यू 3231) बुधवारी रात्री अकरा वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून पार्किंग मधून दुचाकी चोरून नेली. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.