पार्किंगमधून रिक्षा चोरणाऱ्या चोराला अटक

0
335

तळवडे दि.३(पीसीबी): पार्क केलेली रिक्षा चोरांनी चोरून नेली आहे. ही चोरी रुपीनगर, चिखली येथे बुधवारी (दि.1) रात्री एवघ्या एक तासात झाली आहे. आरोपीला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गौरव अनिल सरोदे (वय 26 रा.रुपीनगर तळवडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष भाऊसाहेब भोसले (वय 29 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पार्कींगमध्ये त्यांची (एमएच 14 जेपी9962) रिक्षा पार्क केली होती. आरोपीने पार्कींगमधून रात्री दहा ते अकरा या कालावधीत अवघ्या एक तासात 1 लाख रुपयांची रिक्षा चोरून नेली. फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रारदिल्या नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.