पार्किंगच्या कारणावरून एकास सिमेंटच्या गट्टूने मारहाण

0
84

दापोडी, दि. 28 (पीसीबी) : पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी एका व्यक्तीला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 27) दुपारी कासारवाडी येथे घडली.

महेश कारंडे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी शिवाजी पारेकर (वय 31, रा. वडगाव मावळ) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अवि शिंदे, सोन्या परदेशी, दया लांडगे, नरहरी लांडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक महेश कारंडे हे कासारवाडी येथील यामाहा शोरूम समोर गेले. तिथे त्यांचे आरोपींसोबत पार्किंगच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणात आरोपींनी महेश यांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारले. महेश कारंडे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी महेश यांच्या कारची तोडफोड केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.