पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
141

दि. १६ जुलै (पीसीबी) चिखली,
पायी चालत जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले आहे ही घटना रविवारी. (दि.14) दुपारी चिखली येथे घडली आहे
.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात मोटरसायकल चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरकाम करून नेहमीप्रमाणे पायी चालल्या होत्या. यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे 30 हजार रुपयांचे गंठण हिसकावून चोरून पळून गेले. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.