पायी चालत घरी जात होता; अचानक चोरटयांनी घेरलं……

0
61

निगडी, दि. 24 (पीसीबी) : दगडाने मारण्याची धमकी देत एक तरुणाच्याा खिशातील रोख रक्कम लुटून नेण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 22) सायंकाळी निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर येथे घडली.

विरेंद्रसिह गंभीरसिंह गोहेल (वय 31, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी फिया्रदी गोहेल हे ट्रान्सपोर्टनगर येथून पायी चालले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांना अडविले. डोक्यात दगड मारेल, अशी धमकी देत त्यांच्या खिशातील एक हजार 350 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता लोक मदतील धावून येत असल्याचे पाहून चोरट्याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.