पान टपरी चालकाला दगडाने मारहाण

0
364

वाकड, दि. ३ (पीसीबी) – पान टपरी चालकाला दमदाटी करत शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री विनोदेवस्ती, वाकड येथे घडली.

स्वप्नील उर्फ भोऱ्या घाडगे, दीपक (दोघे रा. काळाखडक, वाकड) आणि एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज अरुणराव जेणकेवाड (वय 25, रा. वाकड. मूळ रा. लातूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची विनोदेवस्ती येथे पान टपरी आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ते पान टपरीमध्ये असताना आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादीस, तू कुठला आहेस, इथे का आला असे विचारत दम दिला. त्यावर फिर्यादींनी प्रतिउत्तर दिले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांना दगडाने मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.