पानटपरी फोडून त्यातील ऐवज लंपास करणारा चोर गजाआड

0
222

मुळशी, दि. २९ (पीसीबी) – पानटपरी फोडून त्यातील रोख रक्कम व सिगारट चोरणाऱ्या चोराला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही चोरी शनिवारी (दि.27) रात्री ते रविवारी (दि.28) सकाली या कालावधीत मारुंजी, मुळशी येथे घडली आहे.

यावरून सुरेश उर्फ सोन्या गोरख जाधव (वय 32 रा. चिंचवड) याला अटक केली आहे. याप्रकरणी सचिन रामदास बुचडे (वय 24 रा.मुळशी) यांनी हिजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फिर्यादी यांचा मारुंजी येथील राजमुद्रा पेट्रोलपंपा जवळ पान टपरी आहे. फिर्यादी यांनी शनिवारी टपरी बंद केली असता चोराने टपरी फोडून त्यातून 3 हजार रुपयांच्या सिगारेट व रोख रक्कम असा एकूण 4 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.