निगडी, दि. ७ (पीसीबी) – शाळेतून दोन मैत्रिणी पायी चालत घरी जात असताना एका तरुणाने त्यांना अडवून गाडी अंगावर घालण्याची धमकी देत त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2022 या कालावधीत भेळ चौक, निगडी येथे घडली.
कुणाल विनायक गवारे (वय 27, रा. प्राधिकरण, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 15 वर्षीय मुलगी आणि तिची 15 वर्षीय मैत्री अशा दोघी शाळेतून घरी पायी चालत जात असताना आरोपीने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. वारंवार पाठलाग करून गाडीवर बस नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालीन, अशी धमकी देऊन मैत्री करण्याचा प्रयत्न करत फिर्यादी यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हणले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.











































