पादचारी महिलेला दुचाकीची धडक

0
6

वाकड,दि. 9 (पीसीबी)

रस्‍त्‍याने पायी चाललेल्‍या महिलेला दुचाकीने धडक दिली. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास शिव कॉलनी, वाकड येथे घडली.

याबाबत ५५ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्‍वाराच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी महिला या रस्‍त्‍याने पायी चालल्‍या होत्‍या. त्‍या शिव कॉलनी येथील एस. के. हेअर सलून येथील रस्‍ता दुभाजकाजवळ उभ्‍या असताना भरधाव वेगात आलेल्‍या दुचाकीने त्‍यांना धडक दिली. या अपघातात त्‍या जखमी झाल्‍या. अपघातानंतर दुचाकीस्‍वार पळून गेला. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.