पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
269

फुगेवाडी, दि. ३० (पीसीबी) – पायी जाणाऱ्या महिलेचे चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले आहे. ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी फुगेवाडी येथे घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पुणे-नाशिक महामार्गावरून त्यांची जाऊ व मुलगी यांच्यासह पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी हे त्यांच्या दुचाकीवर बसले होते. फिर्यादी त्यांच्या जवळून जात असताना एकाने फिर्यादीच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.