पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
188

पिंपरी दि. १७ (पीसीबी) -रस्त्याने पायी जाणा-या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री शाहूनगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता शाहूनगर चिंचवड येथून पायी जात होत्या. त्या नंदिनी हॉटेल जवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या समोरून येऊन ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.