पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
540

आळंदी, दि. १२ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणा-या महिलेचे दोन चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री पावणे दहा वाजता देहूफाटा आळंदी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दोन चोरट्यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देहूफाटा आळंदी येथून जात होत्या. दरम्यान त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळयातील 60 हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. त्यांनतर चोरटे चाकणच्या दिशेने निघून गेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.