पादचारी महिलेचे दागिने हिसकावले

0
277

देहूरोड, दि. ७ (पीसीबी) – पायी जाणाऱ्या महिलेची १५ हजार रुपये किमतीची साखळी चोरट्यांनी हिसकावली आहे. ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री साडेआठ वाजता देहू-आळंदी रोडवर एचडीएफसी बँकेसमोर घडली.

याप्रकरणी महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची भावजयी सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रोडने पायी जात होत्या. त्या एचडीएफसी बँकेसमोर आल्या असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील १५ हजारांची साखळी जबरदस्तीने धक्का मारून हिसकावून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.