पादचारी महिलेचे गंठन हिसकावले

0
598

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) -रस्त्याने पायी जाणा-या महिलेचे 50 हजारांचे गंठन दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री केशवनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्‌यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे गंठन जबरदस्तीने हिसकावले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.