पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

0
321

चऱ्होली, दि. ३० (पीसीबी) – पादचारी महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 28) रात्री चोविसावाडी, चऱ्होली येथे घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास चोविसावाडी येथील द्वारका सोसायटी समोरून पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरट्याने फिर्यादींच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.