पादचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वृद्धास अटक

0
314

देहूरोड, दि. २३ (पीसीबी) – पादचारी महिलेकडे पाहून अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना १९ ते २२ जुलै या कालावधीत किवळे येथे घडली. याप्रकरणी आरोपी वृद्धाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

राजेश केदारनाथ जयसवाल (वय ६४, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. २२) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने पायी चालत जात असताना आरोपी किवळे येथील एका हॉटेल समोर उभा राहून अश्लील हावभाव करत असे. तसेच फिर्यादीला अश्लील भाषेत बोलून त्यांचा नंबर मागत असे. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.