पादचारी महिलेचा मोबाईल हिसकावला

0
236

भोसरी,दि.०८(पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निघोजे येथील महिंद्रा रोडवर अल्ट्रा कंपनी जवळ घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली आहे.

सागर राहुल राठोड (वय 20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) राज अजयसिंग उर्फ पांडुरंग राठोड (वय 18, रा. खडीमशीन रोड, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.