पादचारी तरुणीला कारची धडक

0
95

हिंजवडी, दि. 22 (पीसीबी) : रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका तरुणीला कारने धडक दिली. यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लेनोव्हा एक्झिक्यूटिव्ह स्टोअर हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय जखमी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक प्रणित प्रकाश वाणी (वय 35, रा. हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी लेनोव्हा एक्झिक्यूटिव्ह स्टोअर हिंजवडी येथून पायी चालत जात होती. तरुणीला आरोपी प्रणित याने त्याच्या ताब्यातील कारने धडक दिली. त्यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.