पादचारी तरुणीचा मोबाईल पळवला

0
190

वाकड, दि. २८ (पीसीबी) – पादचारी तरुणीच्या मागून आलेल्या चोरट्याने तरुणीच्या हातातून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 26) रात्री बिग बाजार समोर, हिंजवडी वाकड रस्त्यावर घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रस्त्याने फोनवर बोलत चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून चालत आलेल्या चोरट्याने फिर्यादींना धक्का दिला आणि त्यांचा 20 हजारांचा मोबाईल फोन हिसकावून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.