पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

0
242

महाळुंगे, दि. १८ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 17) महाळूंगे येथे घडली.

प्रतीक भास्कर वाघ (वय 27, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुर रमेश कारले (वय 21, रा. चांदूस, ता. खेड), मयूर मछिंद्र पिलगर (वय 23, रा. झित्राईमळा, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता पायी चालत घरी जात होते. ते महाळुंगे गावातील शिवकृपा हॉस्पिटल जवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी प्रतीक यांच्या हातातून नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे.