पाण्याची मोटार चोरून नेताना चार जणांना अटक

0
83

30 जुलै (पीसीबी) महाळुंगे,
पाण्याची मोटार चोरून नेताना चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पाटीलनगर, मोई येथे घडली.

सयाजी अर्जुन ठाकरे (वय 40), रोहित श्रीब्रिजन पटेल (वय 25), जितेंद्र मनोहरलाल सोना (वय 24, तिघे रा. मोई, ता. खेड), राहुल बाबासाहेब पोमाणे (वय 21, रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शुभम रोहिदास गवारे (वय 27, रा. मोई, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई गावातील पाटीलनगर येथे पाच हजार रुपये किमतीची 7.5 अश्वशक्ती क्षमतेची पाण्याची मोटार चोरून नेताना चौघेजण आढळून आले. नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.