पाणी पुरवठा विभागात लाचखोर पकडला, अधिकाऱ्यांकडेही चौकशी सुरू

0
267

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनातील लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता अशा मंडळींच्या मुस्क्या बांधायची मोहिम उघडली आहे. आज दुपारी लाच घेताना रंगे हाथ सापडल्याने एकाला ताब्यात घेतले असून प्रशासनात मोठी खळबळ आहे.

आज दुपारी तीन त्या सुमारास महापालिका मुख्यालयातील पाणी पुरवठा विभागात अँटीकरपशनची रेड पडली. अँटीकरपशन अधिकाऱ्यांनी एका लिपिकाला ताब्यात घेतले. सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडेही अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.