पाणी पिण्याच्या बहाण्याने आला अन मंगळसूत्र हिसकावून गेला

0
153

शिरगाव, दि. १९ (पीसीबी) – पाणी पिण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने दुकानदार महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी पावणे एक वाजता वडाची वाडी दारुम्बरे येथे घडली.

याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या किराणा दुकानात असताना मंगळवारी दुपारी पावणे एक वाजता एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याने दुकानासमोर दुचाकी पार्क केली आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या दुकानात आला. पाणी पीत असताना त्याने अचानक फिर्यादीच्या गळ्यातील ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.