पिंपरी, दि. २३ पीसीब – दुर्गा देवी टेकडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 16 दक्ष लक्ष लीटर पाण्याची टाकी टेकडीवर करण्याचे नियोजन आहे व (आय एम डी) the India meteorological department यांचा हवामान खात्याचा एक वीस मीटर उंचीचा टॉवर दुर्गा टेकडी येथे लावण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाचा ट्राफिक कंट्रोलचा टॉवरसुध्दा लावण्यात आलेला आहे. अशी सर्व कामे करताना दुर्गा टेकडीवरील बरीचशी जुनी 40 ते 50 वर्षापासून असलेली झाडे महापालिका तोडणार आहे तेथील पक्षी प्राणी यांची खूप मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे ,म्हणून यावरील प्रकल्पांना निसर्ग प्रेमींकडून आणि दुर्गादेवी टेकडी बचाव समितीकडून कडाडून विरोध करण्यात आलेला आहे त्यांच्या विरोधात साह्यांची मोहीम चालवली गेली आहे जवळजवळ तीन ते साडेतीन हजार लोकांनी सह्या करून वरील प्रोजेक्ट ला निषेध केला आहे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना दुर्गा देवी टेकडी येथील निसर्ग प्रेमींनी भेट देऊन निवेदन दिले आहे की वरील कुठलाही प्रोजेक्ट दुर्गादेवी टेकडी येथे करू नये अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना आज देण्यात आले निवेदन देण्यासाठी देवा यंकुळे, रमेश कोरे ,अरुण दादा थोपटे , प्रवीण पायाळ, मल्लिकार्जुन , हरेश शेट्टी , नितीन शेट्टी ,सुरेश घुले , बोऱ्हाडे , रोकडे , किरण पाचपुते ,
वरील सर्व निसर्गप्रेमींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.