पाठलाग करून महिलेचा विनयभंग

0
191

चिंचवड, दि.५ (पीसीबी)- महिलेला मेसेज करून त्रास देणे तसेच तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. तुझा चेहरा पाहिल्यावर माझा दिवस चांगला जातो, असे म्हणणारा अधिक आता त्याच महिलेच्या फिर्यादीमुळे तुरुंगात आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून वाल्हेकरवाडी परिसरात घडला.

गजानन कुशाबा राठोड (वय ४०, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय पीडित महिलेने शनिवारी (दि. ४) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड हा फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत असे. तुला पाहिल्यानंतर मला चांगली बातमी मिळाली. दिवसाची सुरुवात तुला पाहून करावीशी वाटते, अशा प्रकारचे इंग्रजीतून मेसेज करत त्याने महिलेला वारंवार त्रास दिला. महिला तिच्या घराच्या गॅलरीमध्ये थांबली असताना राठोड याने त्याच्या गॅलरीत बसून अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केला. महिलेने याबाबत तक्रार दिली अन जिच्यामुळे दिवस आनंदात जातो असे म्हणत असे तिच्याच फिर्यादीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.