– सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा हादरा
सोलापूर, दि. २५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना धक्का देत पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकणारे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर, पंढरपूरमधील घरावर आणि पतसंस्थेच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने (इन्कम टॅक्स) विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. आज पहाटे ही छापेमारी करण्यात आली असून अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. या छापेमारीमुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दहा दिवसांपूर्वी जालना येथे एका बड्या कारखानदारावर छापे टाकण्यासाठी १०० वाहनांचा ताफा लग्नाचे वऱ्हाडी बनून आला होता. त्या छाप्यात ५८ कोटींची रोकड,३२ किलो सोनं जप्त केल्याने महाराष्ट्रातील जनतेचे डोळे विस्फारले होते. आता तशाच पध्दतीने पंढरपूर येथे छापेमारी कऱणारे अधिकाऱ्यांची वाहने कृषी पदर्शनासाठी चालली आहेत, असा देखाव असल्याने कोणाला लवकर संशय आला नाही.
अभिजीत पाटील हे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पंढरपूरमधील कार्यालय, घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयात इन्कम टॅक्स विभागाची तपासणी सुरू आहे. इतर साखर कारखान्यांमध्ये ही तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. आभिजित पाटील यांच्याकडे सध्या पाच साखर कारखाने आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर प्राप्तीकर विभागाचा छापा पडला आहे. आज पहाटेपासून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केल्याची माहिती आहे. पंढरपूर येथील अभिजीत पाटील हे धाराशिव कारखान्याचे चेअरमन असून त्यांच्या इतर मालमत्तांवर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
अभिजित पाटील यांची ओळख साखर सम्राट निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्याने पाटील प्रकाशझोतात आले होते. तसेच त्यांच्या ताब्यात एकूण पाच साखर कारखाने आहेत.