पाच लाखांच्‍या गांजासह तरुणास अटक

0
163

देहूरोड,पिंपरी, दि. २३ (पीसीबी)

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक करण्‍यात आली आहे. त्‍याच्याकडून पाच लाख आठ हजार ६०० रुपयांचा गांजा हस्‍तगत केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २२) सकाळी सव्‍वासात वाजताच्‍या सुमारास हगवणेवस्‍ती, तळवडे येथे घडली.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार रणधीर रमेश माने यांनी गुरुवारी (दि. २२) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिजित ज्ञानेश्वर भोंडवे (वय १९, रा. वैकुंठ मंदीराजवळ, देहुगाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी अभिजित याने विक्रीसाठी गांजा आणल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्‍यास ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडून पाच लाख आठ हजार ६०० रुपयांचा ऊ किलो ९७२ ग्रॅम वजनाचा गांजा हस्‍तगत केला आहे. हा गांजा आरोपी अभिजित याने जालना येथून अंगत धुमाळ याच्‍याकडून आणला असल्‍याचे सांगितले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.