पाच जणांचे टोळके आपसात भिडले!

0
174

तळेगाव दाभाडे, दि. २३ (पीसीबी) – बिस्किटाचे पूर्ण पैसे न दिल्याच्या कारणावरून पाच जणांचे टोळके आपसात भिडले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री साईनगर, गहुंजे येथे घडली.

पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फुलताज पन्नू खान (वय 18), राहुल पन्नू खान (वय 23), योगेश तात्याराम लवटे (वय 30), पांडुरंग कचरू नेंगुळे (वय 27, रा. आंबेठाण, ता. खेड), नवनाथ चंदर शीरकनवाड (वय 30, रा. ताथवडे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर येथील एका किराणा दुकानातून आरोपी फुलताज खान याने बिस्कीट विकत घेतले. त्या बिस्किटांचे कमी पैसे दिल्याने आरोपींचा आपसात वाद झाला. आरोपींनी सार्वजनिक रोडवर जमाव जमवून शिवीगाळ व भांडण केले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना समजावून सांगितले तरीही आरोपी एकमेकांसोबत भांडण करत होते. याबाबत पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.