पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
47

मुंबई, दि. 8
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच आहेत. पाच
आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज काढण्यात आले.

१. श्री. सी.के. डांगे (IAS:SCS:२०१०) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. श्री. संजय काटकर (IAS:SCS:२०१४) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३. श्रीमती अनिता मेश्राम (IAS:SCS:२०१५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

४. श्री. अभिनव गोयल (IAS:RR:२०१६) जिल्हाधिकारी, हिंगोली यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. श्रीमती आयुषी सिंग (IAS:RR:२०१९) यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.