कराची,दि. २8 (पीसीबी)
पाकिस्तानने अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडत चालले आहेत. काल तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी सीमेच्या दिशेने निघाले होते. आज खोस्त आणि पख्तिया प्रांताला लागून असणाऱ्या सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष सुरु झालाय. तालिबानची आक्रमकता पाहून पाकिस्तानी पंतप्रधानांनी धमकी दिली आहे. तालिबानने लढाई टाळावी, अन्यथा आम्ही हल्ले सुरु ठेऊ. पण तालिबानवर या धमकीचा अजिबात परिणाम झालेला नाही.
पाकिस्तानने ख्रिसमसच्या एकदिवस आधी अफगाणिस्तानात अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला होता. यात 50 जणांचा मृत्यू झाला. एअर स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी तालिबानने ऑपरेशन सुरु केलय. याची माहिती स्वत: तालिबानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तालिबानने दावा केलाय की, “आतापर्यंत त्यांनी पाकिस्तानच्या दोन चौक्यांवर ताबा मिळवला आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे अनेक सैनिक मारले गेले आहेत”
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की, “खोस्त आणि पख्तिया प्रांतात अफगाण आणि पाकिस्तानी सीमा तुकड्यांमध्ये खुनी संघर्ष झाला. यात 19 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत” सूत्रांनी सांगितलं की, “पाकिस्तानने डागलेल्या मोर्टारमुळे दंड-ए-पाटन जिल्ह्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. अजूनही ही लढाई सुरु आहे”
पाकिस्तानी एअर स्ट्राइकमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून बदला घेण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे. तालिबानने मोठ्या संख्येने आपले दहशतवादी तैनात केलेत. पाकिस्तानी सैन्य आणि पीएम शहबाज शरीफ यांनी धमकी दिली होती की, “तालिबानींनी लढाई टाळावी, अन्यथा पुढेही अफगाणिस्तानात हल्ले सुरु राहतील” पाकिस्तानी एअर फोर्सने पाकटीआ प्रांतात हवाई हल्ला करुन 50 लोकांना मारलं. त्यानंतरच सडेतोड उत्तर देऊ अशी तालिबान सरकारने घोषणा केली आहे.