कराची, दि. १ : दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा आर्थिक पुरवठादार आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी कारी अब्दु रहमान याची सोमवारी पाकिस्तानातील कराचीमध्ये एका अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून हत्या केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि व्हिडिओ ऑनलाइन देखील समोर आला.
व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की एक मुखवटा घातलेला माणूस बंदूक घेऊन रेहमानच्या दुकानात आला. काउंटरच्या मागे उभा असताना हल्लेखोराने रेहमानवर गोळीबार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये असेही दिसून आले आहे की बंदूकधाऱ्यांनी दुकानात उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले.
व्हिडिओमध्ये हल्लेखोर इतर लोकांवर गोळीबार करतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की रहमानची हत्या झाली तेव्हा दुकानाच्या काउंटरवर एक मुलगा उभा होता. मुखवटा घातलेल्या व्यक्तीने मुलाला इजा केली नाही. रहमानच्या हत्येचे नेमके कारण कळलेले नाही.