विदेश,दि.११(पीसीबी) – पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आली आहे. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना तारिक रहीम उल्लाह तारिक यांची हत्या करण्यात आली आहे. भारतविरोधी रॅलीत सहभागी होण्यासाठी जात असताना त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कराचीमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी तारिकवर गोळ्या झाडल्या. तारिक हा पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना होता आणि त्याला ऐकण्यासाठी हजारो लोक जमायचे. मौलाना तारिक याच्या वर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मौलाना ज्या सभेला हजर राहणार होती ती कराचीच्या ओरंगी टाऊनमध्ये आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण टार्गेट किलिंगचे आहे. पाकिस्तानात एकामागून एक दहशतवादी मारले जात आहेत. अलीकडेच खैबर पख्तूनख्वामधील बाजौरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अक्रम खान उर्फ अक्रम गाझी मारला गेला. अक्रमची हत्या हा आयएसआय तसेच लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
गाझी हा लष्करसाठी भारताविरुद्धचा सर्वात महत्त्वाचा दहशतवादी होता. अक्रम गाझी तरुणांना भारताविरुद्ध भडकावू शकत होता. तो अनेकदा भारताविरुद्ध विष ओकत असे. आतापर्यंत अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या केल्या जात असलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करचे दहशतवादी होते. पण आता जैशचे दहशतवादीही मारले जात असल्याचे तारिकच्या हत्येवरून स्पष्ट झाले आहे. या वर्षी मार्चमध्ये, हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका टॉप कमांडरला अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये गोळ्या घालून ठार केले होते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला, अज्ञात बंदुकधारींनी कराचीत अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याची गोळ्या झाडून हत्या केली होती, ही देखील टार्गेट किलींग असल्याचे पोलिसांनी म्हटले होते.
दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला इस्लामिक स्टेट (IS) चा टॉप कमांडर म्हणून काम करणारा काश्मिरी दहशतवादी एजाज अहमद अहंगर अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात मारला गेला. त्याला तालिबानने ठार केल्याचे वृत्त आहे.