पाकिस्तानवर लष्करी कारवाई कधी ?

0
2

दि . २४ ( पीसीबी ) – पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशभरातून आलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्यानंतर गुरुवारी बिहारमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता कठोर संदेश दिला. कल्पनासुद्धा करणार नाही, अशी शिक्षा दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांचा कट रचणाऱ्यांना होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी भारताची एअर स्पेस पाकिस्तानसाठी बंद करण्याचे सूचवले. लष्करी कारवाई कधी होईल? त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले की, आता भारताने कूटनीतीचा अवलंबन केला पाहिजे. भारतात असलेल्या विविध देशांच्या राजदूतांना पहलगाव हल्ल्याची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम कळतील. आंतरराष्ट्रीय जनमत आपल्याकडे येईल. त्यामुळे जेव्हा भारत लष्करी कारवाई करणार, तेव्हा ते भारताच्या बाजूने राहतील किंवा ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी पाकिस्तानला सरळ करण्यासाठी आणखी एक उपाय सांगितला. ते म्हणाले की, भारताची एअर स्पेस आता पाकिस्तानला वापरु देऊ नये. त्यांना जेव्हा भारताची स्पेस मिळणार नाही, तेव्हा त्यांना श्रीलंकेला वळसा घालून जावे लागेल. त्यांच्यासाठी ते परवडणार नाही. त्याचा मोठा परिणाम त्यांच्यावर होईल. पाकिस्तान नेमके काय करत आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर कळायला पाहिजे. लष्करी कारवाई जेव्हा होईल, तेव्हा होईल. ते कशी होईल, ते सुद्धा येणारा काळातच कळेल, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेल्या निर्णयांचे कौतूक केले. भारताने सिंधु पाणी वाटप करार रद्द केला. हा चांगला निर्णय आहे. 1960 च्या नंतर प्रथमच असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा परिणाम किती होईल, हे आता सांगता येणार नाही. मात्र पाकिस्तानमध्ये गहू आणि मक्याचे ज्या ठिकाणी पीक घेतले जाते, त्या ठिकाणी त्यांना पाण्याची गरज असते. परंतु आता त्यांचे पीक कापणीवर आले असल्याने सध्या त्याचा परिणाम होणार नाही. मात्र पुढील हंगामात त्याचा परिणाम दिसून येईल.

करतारपूर कॉरिडॉर बंद केला. त्याचा परिणाम फारसा होणार नाही. कारण त्यांचे लोक आपल्याकडे येत होते आणि आपल्याकडील शीख बांधव तिकडे जात होते, असे वाटत नाही, असे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.