पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी, १४ वर्षे तुरुंंगवास

0
8

कराची, दि. 17 (पीसीबी)
पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इंसाफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना आणखी एक मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानी कोर्टाने इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट प्रकरणात 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्ष कारागृहाची शिक्षा झालीय. भ्रष्चाराशी संबंधित हे प्रकरण आहे. न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी अडियाला तुरुंगात या शिक्षेची घोषणा केली. जेलमध्ये अस्थायी कोर्ट बनवण्यात आलं होतं. दोघांवर प्रत्येकी 10 लाख आणि 5 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

डॉनच्या एका ऑनलाइन रिपोर्ट्नुसार उच्च सुरक्षा व्यवस्थेदरम्यान बुशरा बीबीला कोर्टातून अटक करण्यात आली आहे. इम्रान खान आधीपासूनच तुरुंगात बंद आहेत. 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणुकीनंतर तात्काळ हा गुन्हा नोंदवण्यात आला. “मागच्या दोन वर्षात जो अन्याय झालाय. त्या आधारावर निष्पक्ष निर्णय झाला, तर इम्रान खान आणि बुशरा बीबी यांची सुटका होऊ शकते” असं पीटीआयचे चेअरमन बॅरिस्टर गोहर अली खान सुनावणी दरम्यान म्हणाले होते.

रिपोर्ट्नुसार इम्रान आणि बुशरा बीबी यांच्यावर बहरिया टाऊन लिमिटेडद्वारे अब्जो रुपये आणि शेकडो कनाल जमीन मिळवली असा आरोप होता. यूनायटेड किंगडमद्वारे पाकिस्तानला 50 अब्ज रुपये वैध करण्यासाठी परत करण्यात आले होते. तो हा सर्व पैसा होता. डिसेंबर 2023 साली इस्लामबादच्या न्यायालयाने या प्रकरणात निकाल देण्यासाठी 6 जानेवारीची तारीख निश्चित केलेली. न्यायाधीशांची अनुपस्थिती आणि अन्य कारणांमुळे निकालाला विलंब झाला.

नॅशनल अकाऊंटबिलिटी ब्यूरो NAB ने डिसेंबर 2023 मध्ये इमरान आणि अन्य सात आरोपींविरोधात भ्रष्टाचाराच प्रकरण नोंदवलं. यात आरोप करण्यात आला की, इम्रानने बेकायदरित्या राज्याचा पैसा बहरिया टाऊनच्या खात्यात स्थानांतरीत केला. अन्य आरोपींमध्ये प्रॉपर्टी टायकून मलिक रियाज हुसैन त्यांचा मुलगा आणि पीटीआय सरकारमधील पूर्व अधिकाऱ्यांची नावं आहेत. या प्रकरणात महत्त्वपूर्ण साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिली.