पांढऱ्या रंगाच्या कार मधून तो खाली उतरला; हातात पिस्तूल घेऊन….

0
57

वाकड, दि. १८ (पीसीबी) : वाकड येथील फिनिक्स मॉलच्या गेटवर एका व्यक्तीने गोळीबार केला. ही घटना मंगळवारी (दि. 17) सायंकाळी घडली.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील फिनिक्स मॉलच्या गेटवर पांढऱ्या रंगाच्या कार मधून आलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केला. त्यानंतर गोळीबार करणारा व्यक्ती पळून गेला. सीसीटिव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

फिनिक्स मॉलच्या गेटवर मंगळवारी सायंकाळी एकजण कार मधून आला. तो गेटवर येऊन थांबला त्याने पिस्तूल काढून मॉलच्या दिशेने एक राऊंड फायर केला. गोळीबार होताच आजूबाजूचे लोक घाबरून पळून गेले. गोळीबार करून आरोपी देखील तिथून पळून गेला.

माथाडीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे. गोळीबार करणारा संशयित व्यक्ती विकी बाळा शिंदे असल्याचे म्हटले जात आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.