पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय पतीने केले दुसरे लग्न

0
473

हिंजवडी, दि. १० (पीसीबी) – पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. विवाहितेचा छळ करून तिची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार जून 2019 पासून 10 जुलै 2022 या कालावधीत दिल्ली, वाराणसी, गुडगाव आणि इतर ठिकाणी घडला.

याप्रकरणी 31 वर्षीय पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुजित सिंग (वय 35), सासू (वय 53) आणि सासरे मदनमोहन सिंग (वय 55, रा. दिल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना लग्न झाल्यापासून पैशांचे व इतर कारणावरून वारंवार टोचून बोलून छळवणूक केली. फिर्यादी यांच्या नावे चार लाख रुपये कर्ज काढण्यास लावले. ते फिर्यादी आणि पती असे दोघांनी मिळून फेडणे आवश्यक असतानाही कर्ज फिर्यादी यांना फेडायला लावून आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी या नांदायला तयार असताना त्यांच्याशी कायदेशीर फारकत न घेता पतीने दुसरे लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.